दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत
आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे यश
नांदेड दि. ३० /प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध खेळाच्या प्रकारात यश मिळविले आहे. तर सांस्कृतिक स्पर्धेतही या शाळेच्या बालकलाकारांनी “जय हो” हे नृत्य सादर करुन आपणही सामान्य कलाकाराप्रमाणेच कला सादर करतो हे दाखवून दिले आहे. या उत्कृष्ट सादरीकरणास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे.
दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय अशा एकूण 10 खेळाडूंनी यश मिळविले आहे. तर सांस्कृतिक स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच “जय हो” हे देशभक्तीपर नृत्य सादर केले. या उत्कृष्ट सादरीकरणास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक मधुकर मनुरकर, आनंद शर्मा यांनी मार्गदर्शन केले आहे.
शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष रामनारायण काबरा, सचिव प्रकाश मालपाणी, शाळेचे मुख्याध्यापक नितिन निर्मलसह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.


