शैक्षणिक उपक्रम

  • विद्यार्थ्या सुनियोजित पणे वैयक्तिक मुल्यांकन करून इयत्ता निर्धारण (गटवारी) करण्यात येते.
  • वैयक्ति मुल्यांकनाच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करून त्याची अमंलबजावणी करण्यात येते.
  • विद्यार्थ्यांच्या अभ्यासकम्रमाच्या वैयक्ति फाईल्स अद्यावत करण्यात येतात.
  • विद्यार्थ्यांच्या वर्तन समस्यांचे निरीक्षण करून त्या सोडविण्याकरिता उपाययोजना करण्यात येते.
  • पालक सभा आयोजित करून पालकांच्या समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला जातो.
  • मतिमंदाच्या सात कौशल्यावर आधारीत सु-नियोजित वेळापत्रक तयार करून अमलबजावणी करण्यात येते.
  • तांत्रिक व सुनियोजित पध्दतीने विद्यार्थ्यांचे प्रगती दर्शक अहवाल तयार केले जातात व सुनियोजित पणे वर्ग व्यवस्थापन करून शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
  • वर्ग सजावट स्पर्धाच्या माध्यमातून वर्ग बोलके करण्यात येतात. 
  • अपंगत्वाची कारणे, प्रतिबंधात्क उपाय व उपचार याचे सचित्र मार्गदर्शन शाळेच्या दालनात लोकाभिमुख करण्यात आले आहे.
  • वाचा उपचार पध्दतीचा अवलंब केला जाऊन विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार वाचा उपचार दिले जातात.
  • विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार भौतीक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो.
  • विद्यार्थ्यांना शारिरीक दृष्टया सक्षम बनविण्याकरिता योगासने घेतली जातात.
  • विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार चित्रकला, हस्तकला शिकवली जाते.
  • प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांचे मानसीक स्वास्थ व एकाग्रता वाढविण्यासाठी संगित उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो.
  • वर्ग सुनियंत्रीतपणे रहावेत याकरिता प्रत्येक वर्गात सि.सि.टिव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
  • कुवतीनुसार विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.