आर. आर. मालपाणी मतीमंद विद्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

मालपाणी मतिमंद व मुकबधीर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ओमप्रकाश तापडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण

मालपाणी मतिमंद व मुकबधीर विद्यालयात
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ओमप्रकाश तापडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण



नांदेड दि २६, शहराच्या मगनपुरा भागातील मालपाणी मतिमंद व मुकबधिर विद्यालयात शुक्रवार दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे जनसंपर्क मंत्री श्री ओमप्रकाश तापडीया यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उद्योगपती रमेश डागा यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

ध्वजारोहणापूर्वी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य रामेश्वरजी कोठारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक निर्मल यांनी देशाचे संविधान, प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजीच का साजरा केला जातो याबाबत माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच गरीब व होतकरु मतिमंद विद्यार्थिनीला ड्रेसचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील मतिमंद व मुकबधिर विद्यार्थ्याना विद्यालयातील माजी विद्यार्थी पिलगुंडे, गणेश कोकाटे, लॉयंस क्लब एंजल यांच्या वतीने अल्पोपहार तर मुकेश ठक्कर यांच्या तर्फे वॉटरबॉटल चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जेष्ठ सदस्य बनारसीदासजी अग्रवाल, डॉ. सुरेश दागडीया, अॅड. चिरंजीलाल दागडीया, बद्रीनारायण मंत्री, संजय बजाज, अरुण तोष्णीवाल,  शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक, उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.










नशामुक्त अभियानाअंतर्गत आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

नांदेड दि. १२, नशामुक्त अभियानाअंतर्गत येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी मी कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचा संकल्प घेतला आहे. 

देशात विशेषतः युवा वर्गातील वाढते व्यसनाचे प्रमाण चिंतेची बाब आहे. देशातील सर्व नागरिक व्यसनापासून दूर राहावे यासाठी देशभरात नशामुक्त अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक १२ रोजी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात व्यसनमुक्ती संकल्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी व्यसनमुक्ती मुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव आपल्या विचारातून व्यक्त केली.

भविष्यात प्रत्येक जन व्यसनमुक्त राहावे यासाठीची सुरुवात आपल्यापासून व्हावी असा सल्ला देत त्यांनी कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती संकल्पाची प्रतिज्ञा दिली. यावेळी विशेष शिक्षक गणेश धुळे, संजय रुमाले, मुरलीधर गोडबोले, आनंद शर्मा, कला शिक्षक मधुकर मनुरकर, सौ. संगीता नरवाडे, सौ मनीषा तिवारी, सौ. सुप्रिया कराड, किरण रामतिर्थे, अविनाश सुरनर गयाबाई सोनकांबळे, श्याम घंटेवाड, शेख आरिफ, भिमराव दहिकांबळे, दत्ता रामतिर्थे, जिजाबाई खरटमोल आदी कर्मचाऱ्याची  उपस्थिती होती.

दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली. शाळेपासून निघालेल्या या रॅलीस संस्थेचे डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी हिरवा झेंडा दाखविला. या रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या तसेच देशभक्तीपर गीतांचेही वादन यावेळी करण्यात आले. शाळेपासून निघालेली ही  रॅली  नवा मोंढा, मगनपुरा, आनंद नगर, वसंत नगर मार्गे काढण्यात आली.












आर. आर. मालपाणी मतिमंद शाळेचा नाविण्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा ; दर महिन्यात आरोग्य तपासणीही

आर. आर. मालपाणी मतिमंद शाळेचा नाविण्यपूर्ण उपक्रम

विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा ; दर महिन्यात आरोग्य तपासणीही


नांदेड दि. 23 शहराच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकसह सर्वच क्षेत्रांत भरीव विकास व्हावा यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवते या उपक्रमाचा पॅटर्न अन्य शाळेसाठी प्रेरणादायी ठरत आहे असाच आणखी एक नाविण्यपूर्ण उपक्रम या शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे यात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा वाढदिवस त्यांच्या शाळेतील मित्र तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा तसेच साथीचे आजार तसेच अन्य आजारांची वेळीच माहिती मिळाल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करणे सोपे होते यासाठी दर महिन्यात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत शनिवार दि. 23 जुलै रोजी योगेश पांचाळ या विद्यार्थ्याचा वाढदिवस तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. सौ. शोभा अनिल तोष्णीवाल यांनी केली आहे.



या शाळेतील विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासह आपला विद्यार्थी भविष्यात स्वावलंबी होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी नवनवीन उपक्रम राबवविले आहेत. यातून शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत आहेत. यासमवेतच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यासह जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातील १८ वर्षाआतील मस्तिष्क रुग्णांसाठी वर्षात दोन वेळा या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. गत दोन वर्ष कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करता आली नाही. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने यावर्षी जून पासून प्रत्यक्ष शाळेला प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी तसेच घरच्याप्रमाणे या विद्यार्थ्याचा त्यांचे मित्र व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर महिन्यात मुलांच्या आरोग्याची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. शनिवार दि २३ जुलै रोजी योगेश पांचाळ या विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थी व सर्व कर्मचार्‍याच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यासमवेतच डॉ. सौ. शोभा अनिल तोष्णीवाल यांनी विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली. शाळेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम अन्य शाळेसाठी प्रेरणादायक ठरत आहे.